पवना शिक्षण संकुलाच्या वतीने देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन
पवनानगर:
पवना शिक्षण संकुलाच्या वतीने देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

  संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असून दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा घर घर तिरंगा निमित्ताने सर्व नागरिकांनी  तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या घरावर उभारयचा आहे त्यानिमित्त जनजागृती व्हावी म्हणून पवना विद्या मंदिर शाळेतून रॅली काढली शाळा पवनानगर चौक ते ग्रामसचिवालय रॅली काढण्यात आली. शनिवारी संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली.
 
शाळेतून निघालेली प्रभातफेरी पवनानगर चौक ते सचिवालय पवनानगर अशी काढण्यात आली.या रॅलीत शाळेतील ५ वी ते १० पर्यंतचे ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते
यावेळी भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दूमदुमून गेला होता.

यावेळी या रॅलीत पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थी यांंच्यासह सांस्कृतिक विभाग प्रमूख सुनिल बोरुडे,क्रिडा विभाग प्रमुख राजकुमार वरघडे,भारत काळे,गणेश ठोंबरे, महादेव ढाकणे,शिक्षक प्रतिनिधी अमोल जाधव, जेष्ठ अध्यापिका छाया कर्डीले, पल्लवी दुश्मन, सुवर्णा काळडोके  यांंच्यासह सर्व अध्यापक अध्यापिका या रॅलीत  सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना प्राचार्य भाऊसाहेब आगळमे म्हणाले की, या तीन दिवसांच्या दरम्यान  ध्वजारोहण, मेरी माटी मेरा देश, पंचप्राण शपथ,वसुधा वंदन, शिलाफलक, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन असे विविध उपक्रम  राबविण्यात येणार आहे‌ यामध्ये परिसरातील लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!