भाजीपाला आणि जिऱ्यांच्या दरवाढीपाठोपाठ आता लसूणही वधारल्याने भाजीची फोडणी महागली
नवी मुंबई : पावसाचे उशिरा झालेलं आगमन तसेच पावसाने मारलेली दडी यामुळं भाज्यांचे उत्पादन कमी परिणामी आवक कमी पुरवठा कमी व मागणी जास्त त्यामुळं भाज्यांच्या किंमती कमालीचा भडकल्या आहेत. टोमॅटोनं  शंभरी गाठली आहे .

आता भाज्याबरोबर लसणाची फोडणी देखील महागली आहे. कारण लसणाच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लसणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भाजीपाला आणि जिऱ्यांच्या दरवाढीपाठोपाठ आता लसूणही वधारल्याने भाजीची फोडणी महागली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचे दर किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढले आहेत.

सध्या भाजीबाजारात एक किलो लसणासाठी १५० ते १८० रुपये, तर गावठी लसणासाठी २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळं आता टोमॅटोसह लसणाची फोडणीही महागल्यानं गृहिणीचे बजेट कोलमाडले आहे.

एकिकडे भाजीपाला, टोमॅटो, लसणीच्या दरात वाढ होत असताना, आता शेंगाणाचा वाटाण्याच्या किंमती देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात शेंगाणा वाटाण्याची किंमत २४० रुपये ते ८० रुपये किलो आहे. तर टोमॅटो १४० त १८० रुपये किलोनं विकला जात आहे. भाजीपाला आणि जिऱ्यांच्या दरवाढीपाठोपाठ आता लसूणही वधारल्याने भाजीची फोडणी महागली आहे.

लसणाची पुणे, राजस्थान आणि मध्यप्र देशहून लसणाची आवक होत असते. परंतु, गेल्या वर्षी हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आवक जवळपास २५ टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे दर वाढलेले असून, येत्या काळात त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी भाजीबाजारात लसूण १०० ते १२० रुपये किलो, तर गावठी लसूण १५० ते १८० रुपये किलोपर्यंत उपलब्ध होता. मात्र, आता लसणाचे दर ४० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. फोडणीसाठी लसूण आणि जिऱ्यांच्याही दरांत वाढ झाली आहे.

error: Content is protected !!