तळेगाव दाभाडे :
राज्यातील पोल्ट्री  व्यावसायिकांच्या  अडीअडचणी  सोडविण्यासाठी  आपण शासन दरबारी  विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही  भारतीय जनता पक्ष  किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी  दिली.

   मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या पदाधिकार्यानी  महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे  राज्य संघटक सोनबा गोपाळेगुरूजी  व तालुका  अध्यक्ष एकनाथ गाडे  यांचे यांचे मागॅदशॅनाखाली  किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची सदिच्छा भेट घेऊन  राज्यातील पोल्ट्री उद्योजकांच्या मागण्याचे निवेदन  दिले.यावेळी  कार्याध्यक्ष सुभाष केदारी ,सचिव प्रविण शिंदे ,सचिन आवटे,  संभाजी शिंदे, बाबाजी पाठारे,  संभाजी केदारी ,एकनाथ  पोटफोडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
   
         यावेळी  पदाधिकार्यानी  पोल्ट्री  व्यावसायिकांच्या अडीअडचणी  तसेच विविध  प्रश्नांवर  मनमोकळेपणाने  चर्चा केली.  यात पोल्ट्री  शेडचा  ग्रामपंचायत  टॅक्स  कमी  करावा , विज बिल कमी व्हावे   भारत सरकारने  पोल्ट्री  व्यवसायासाठी  राज्याकरिता  बनवलेली मार्गदर्शक तत्वे  स्वीकारावी आदी प्रश्नांवर  सविस्तर चर्चा केली.
        
     राज्य शासनाच्या  महसूल  कृषी  व पशुसंवधॅन  तसेच  उर्जा खाते याचे मंत्री  व वरिष्ठ अधिकारी  यांचेशी संपर्क  करुन मार्ग  काढु अशी ग्वाही श्री  भेगडे यांनी यावेळी  दिली.  राज्य  संघटक सोनबा गोपाळेगुरूजी यांनी चर्चेचे  सुत्रसंचालन केले.तर अध्यक्ष एकनाथ गाडे  यांनी आभार मानले.

error: Content is protected !!