कार्ला शाळेतील गरजू गरीब मुलांना शालेय बॕगचे वाटप
कै .अॕड कु शलाका खांडगे यांंच्या स्मृतिदिना निमित्त वाटप
कार्ला-:
कै.ॲड कुमारी शलाका संतोष खांडगे चारिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कै. ॲड. कु.शलाका संतोष खांडगे हिच्या स्मरणार्थ श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी रोटरी हॅप्पी स्कूल बॅग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी कार्ला गावच्या सरपंच दिपाली हुलावळे काॕलेजचे प्राचार्य संजय वंजारे,शिक्षक प्रतिनिधी संतोष हुलावळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी यांच्या हस्ते रोटरी हॅप्पी स्कूल बॅग इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थी यांना वाटप करण्यात आले.
कै.कुमारी शलाका संतोष खांडगे स्मृतिदिनानिमित्त शालेय बॅग वाटप या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव संतोष खांडगे तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय. डी.सी.यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल शेटे यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी संतोष हुलावळे यांनी मानले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस