इंदोरी:
कुंडमळा येथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत सूचना फलक लावण्यात आले आहे. पोलिसांनी लावलेल्या सूचनांचा पर्यटकांनी आदर करावा अशी अपेक्षाही या सूचना फलक लावण्या मागे आहे.
पावसाळा सुरु झाला आहे, मुसळधार पाऊस व मावळातील निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते त्यातीलच एक नाव म्हणजे शेलारवाडी नजीक असणारे कुंडमळा.
या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच अनेक भागातून अनेक नागरिक निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात परंतु कुंडमळा हे ठिकाण अतिशय धोकादायक असून त्या ठिकाणी नवीन आलेल्या पर्यटकांना पाण्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या कुंडमळा येथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने इंद्रायणी नदीपात्रातून उतरून कोणीही फोटो काढू नये ,सेल्फी काढू नये, तसेच हे ठिकाण धोकादायक असून याठिकाणी अनेक व्यक्तींचा बुडून मृत्यू देखील झालेला आहे अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहे.
त्यावेळेस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत उपनिरीक्षक मारुती मदेवाड ,पोलीस नाईक प्रशांत वाबळे, पोलीस नाईक किसन कोळप , पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे उपस्थित होते.
त्यावेळेस उपस्थित पर्यटकांना पोलिसांमार्फत सदर ठिकाणी इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये वाढ झाली आहे तसेच नागरिकांना होणारा धोका याबाबत देखील मार्गदर्शन करून सूचनांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस