कामशेत:-
साकव पूल वाहून गेल्याने नाणे मावळातील सात गावांचा रस्ता बंद झाला आहे.गावक-यांची पर्यायी मार्गाने जाण्यासाठी धडपड सुरू आहे.पावसा पाण्यात वीस किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे.काही गावकरी चिखलाच्या निसरड्या रस्त्याने वाट शोधीत आहे.
कामशेत वरून वडिवळे जवळ असणारा साकव पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेला. यामुळे सात गावांच संपर्क तुटला आहे .सांगिसे वळक,वडिवळे, बुधवडी, नेसावे ,खांडशी, वेल्हवळी गावातील गावक-यांची यामुळे गैरसोय वाढली आहे. नवीन पुलाचे काम चालू आहे ते काम अपूर्ण असून जुन्या पुलावर बांध घातला होता .
पावसाचा जोर वाढल्याने पाणी वाढले आणि तो बांध फुटला त्यामुळे हा पूल काही प्रमाणात वाहून गेला त्यामुळे सात गावातील लोकांचा कामशेत शहराशी जनसंपर्क तुटला असून त्यात गावातील नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे .
यामध्ये प्रामुख्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अतिशय अवघड झाले आहे पर्यायी रस्ता जवळचा नसल्यामुळे सर्व नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे यामध्ये दूध विक्रेते कामगार वर्ग नोकरदार शाळेत येणारे शिक्षक शाळेचे विद्यार्थी व शेतकरी वर्ग यांचा कामशेत शहराशी असणारा संबंध पूर्णपणे तुटला आहे .
आणि नवीन पूल चार महिने पावसाळा संपल्यानंतर पूर्ण होईल तोपर्यंत या नागरिकांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे या परिसरातील नागरिक पर्यायी रस्त्याची मागणी करत आहेत शिवाय मुंढावरे मार्गे जाणारा रस्ता अतिशय खराब असल्याने पावसात त्या रस्त्यातून प्रवास करणे अतिशय अवघड झाले आहे .या लोकांना उंबरवाडी मार्गे कामशेतला यावे लागणार आहे त्यामुळे त्यांना बराच वेळ प्रवासासाठी जाणार आहे.
या परिसरातील नागरिकांचे म्हणणे असे आहे की नवीन पुल उशिरा बांधायला घेतला जर तो लवकर बांधला असता तर आधी अवस्था झाली नसती किंवा नवीन पुल पूर्ण होईल तोपर्यंत जुना पुल चालू ठेवायचं होतं म्हणजे आज नागरिकांवर ही वेळ आली नसती शासनाच्या दिरंगाई मुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.