अच्युतपदी थोरही बिघडतो…
होय होय मित्रांनो,
1964 यावर्षी मी माझं खानदेशातील गाव सोडलं पण अजूनही माझी नाळ त्या गावाशी निगडित आहे. माझ्याबरोबरच एक अत्यंत गरीब पण कष्टाळू मित्र शिकत होता.
रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर तो एसटी स्टँड वर खारे शेंगदाणे विकायचा! मी तिकडे वैद्यकीय क्षेत्रात पदवी मिळवण्यासाठी धडपड करत होतो! तसंच तो बाहेरून परीक्षा देऊन कॉमर्स पदवीधर झाला! पण त्याबरोबरच त्याने खारे शेंगदाणे तयार करण्याचा कारखाना निर्माण केला.
मिळालेल्या उत्पन्नातून त्याने दोन-तीन एकर जमीन घेतली परत ती चढ्या भावाने विकली!असे करता करता त्याची सांपत्तिक स्थिती प्रचंड सुधारली उत्तम! सुशील संवेदनशील अशी सहधर्माचरणीही त्याला मिळाली! गावातील अनेक संस्थांशी त्याचा संपर्क आला! त्या त्या संस्थांना त्याच आर्थिक योगदान सुरू झालं! त्यामुळे त्याला हळू सामाजिक प्रतिष्ठा ही प्राप्त झाली.
आमच्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेत तो सन्माननीय सभासद झाला! मित्रांनो- पुढे दुर्दैवाने ह्या त्याला लागोपाठ मिळालेल्या यशाचा परिणाम असा झाला की त्याच्या बोलण्यातून वागण्यातून एक उर्मटपणाचा दर्प येऊ लागला! त्यामुळे हळूहळू तो समाजापासून दुरावत चालला पण हे त्याच्या गावीही नव्हतं.
कारण तो स्वतः यशाच्या धुंदीत अखंड बुडालेला होता! आज तर अशी परिस्थिती आहे की गावातील कुठल्याही संस्थेचा तो सभासद राहिलेला नाही! कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी त्याला निमंत्रण मिळणे दुरापास्त झाले! त्यामुळे समाज किती कृतघ्न आहे! कष्टाने मिळविलेल्या माझ्या यशावर प्रत्येक जण जळतो आहे अशी त्याची मनाची धारणा झाली!
त्यामुळे तो सहाजिकच समाजाचा द्वेष करू लागला! मित्रांनो– हे सर्व मी माझ्या मित्राच्या बाबतीत प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लहानपणी मला शाळेत शिकवलेल्या त्या म्हणीची प्रकर्षाने आठवण झाली की–अत्युच्चपदी थोरही बिघडतो हे- त्याच्या बाबतीत प्रत्यक्ष साक्षी म्हणून मी अनुभवायला लागलो!
त्याच्या आजच्या आयुष्याच्या वळणावर– सामाजिक संपन्नता ही त्याला मिळालाच पाहिजे होती!पण–केवळ त्याच्या एक्रा दुर्गाणूमुळे तो यापासून वंचित राहिला कारण- –सर्व गुणांचा राजा म्हणजे नम्रता! आणि याच नम्रतेची जागा त्याच्या गर्विष्ट स्वभावाने घेतली! कारण– त्याला मिळालेले यश तो पचवू शकला नाही! म्हणूनच मित्रांनो– विविध क्षेत्रातील अशी अनेक उदाहरण माझ्या या मित्रासारखीच आहेत!
आपल्यातील अनेकजण सर्वगुणसंपन्न आहेत! पण मी हे असं केलं! मी त्याला शिकवलं! माझ्यामुळे तो मोठा झाला! मी त्याचा गुरू आहे पण– तो आता मोठा झाला आहे आणि मला विचारत नाही! हे असं एखादी व्यक्ती सारखी समाजात सांगत राहिली तर
— त्या व्यक्तीला समाज स्वीकारू शकत नाही! म्हणून दुर्दैवानं– आपल्याकडे ही– सर्वगुण संपन्नता असली तरी- जर आपले पाय जमिनीवर नसतील तर सामाजिक प्रतिष्ठा आपल्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही! आणि या आयुष्याच्या तळावर जिथे ज्याची खरी आवश्यकता आहे! आणि त्याच वेळी या सामाजिक सन्मान प्रतिष्ठेपासून आपण केवळ आपल्या स्वभावामुळे वंचित रहाल!
म्हणून मित्रांनो- आपल्या जगद्गुरू- संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे– असाध्य ते साध्य! करिता सायास! कारणे अभ्यास तुका म्हणे!! असे कष्टाने मिळवलेले यश तुमच्या डोक्यात भिनले तर-सामाजिक प्रतिष्ठेचे सुख तुम्ही कधीच अनुभवू शकणार नाही! हे कटू सत्य तुम्हाला स्वीकारावेच लागेल! म्हणून यशाच्या उच्च शिखरावर आपण पोहोचला असाल तर थोडी काळजी घ्यायची आहे—_-जमिनीच भान ठेवून उंच उंच उडायचं आहे!
मातीची आण घेऊन आभाळाला भिडायचं आहे! पुढे पुढे जाताना मागेही वळायचं आहे! माणसातला माणूस ओळखून बुद्धिबळ खेळायच आहे! शुभेच्छांचे वलय आहे तुमच्या भोवती! ऑल द बेस्ट म्हणतो आहे आपल्याच येणाऱ्या भविष्यासाठी! येणाऱ्या भविष्यासाठी!! हाच आपल्या आजच्या चिंतनाचा विषय होता! तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून मी येथेच थांबतो!
(शब्दांकन-ला. डॉ. शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस