जीवन यांना कळले हो!
मित्रांनो,
जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.त्यापैकी पहिला प्रकार– जी वनस्पती आपली फळे स्वतःहून देतात- उदाहरणार्थ आंबा आहे पेरू आहे चिकु केळी इत्यादी दुसऱ्या प्रकारची वनस्पती आहे .
ती- आपली फळे स्वतः लपवून ठेवतात उदाहरणार्थ गाजर- मुळा- बटाटा- कांदा त्यांना मनुष्यप्राणी मुळासकट काढून फेकून देतो! मित्रांनो ज्या वनस्पती स्वतःहून आपली फळ देतात त्यांना सर्वजण खतपाणी घालतात.
त्यांची मशागत करतात त्यांना जीव लावतात त्यांना समृद्ध करतात आणि त्यामुळे ती रसाळ फळे मधुर अवीट गोडीन आपल्याला तृप्त आणि प्रसन्न करतात! या निसर्ग दत्त वनस्पती सारखेच आपल्या मनुष्य जातीत स्वभावाचे गुणधर्म आपल्याला आढळतात!
जो- माणूस आपली विद्या धन शक्ती स्वतःहून समाजाच्या सेवेसाठी अर्पित करतो तो समाजात मान-सन्मान प्राप्त करण्यास यशस्वी ठरतो! त्याची चांगली कीर्ती रातराणीसारखी सर्वत्र पसरते कारण तो आपल्या बरोबरच स्वतःला आणि इतरांना आनंद देतो!
याउलट मित्रांनो- जो मनुष्य आपली विद्या ज्ञान धनशक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो! दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासकट उपटला जातो! आता प्रश्न असा येतो की आपण कुठल्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये आपली वृत्ती जोपासतो?
कारण ही वृत्ती जोपासणे हे मात्र निश्चितच आपल्या हातीच असते! करण सद्सद्विवेकबुद्धी सर्वांना प्रत्यक्ष परमेश्वराने आशीर्वाद देऊन प्रदान केलेली आहे! त्या बुद्धीचा वापर दोन्ही प्रकारे आपण करू शकतो! अर्थात त्याचे होणारे चांगले किंवा वाईट परिणाम आपल्याला माहित असूनही भोगायचे असतील तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच ठरू! म्
हणून मला वाटतं आजचा चिंतनाचा विषय निसर्गाच्या आधाराने आपल्या पर्यंत पोहोचला असेल आणि आपल परिवर्तनशील मन निश्चितपणे याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघू शकेल- कारण एक झाड आगपेटीच्या लाखो काड्या बनवू शकतो- परंतु एकच काडी लाखो झाडांना आग लावण्यास पुरेशी ठरते!
तसंच एखादा नकारात्मक विचार हजारो स्वप्नांना जाळू शकतो त्यामुळे आपण नेहमीच सकारात्मक विचारांचा स्वीकार करावा तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल! आजचा विषय आपल्याला कळलेला आहे म्हणून मित्रांनो मी इथेच थांबतो धन्यवाद!
(शब्दांकन- ला.डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन
- संक्रातीच्या निमित्ताने प्रशांत भागवत मित्र परिवाराच्या वतीने तिळगुळाचे वाटप