तळेगाव दाभाडे:
लायन्स क्लब तळेगाव आयोजित सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास शिबिर”- उद्घघाटन झाले. १ मे महाराष्ट्र दिनाच औचित्य साधून ज्येष्ठ लायन डॉक्टर  शाळीग्राम भंडारी यांच्या शुभहस्ते लायन मयूर राजगुरव यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे प्रज्वलन करून विधिवत उद्घघाटन झाले.

हे उन्हाळी शिबिर दिनांक एक मे ते सातमे- यादरम्यान सकाळी आठ पासून तर संध्याकाळी सात पर्यंत हे शिबिर सहभागी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहील.या शिबिरात- स्केटिंग कराटे- नृत्य- लाठी काठी- बुद्धिबळ अशा विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी तज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल आणि ते केवळ पाचशे रुपयाच्या नाममात्र  फी तून.

लायन अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी उपस्थित सर्व पालक विद्यार्थी आणि लायन्स सभासदांचे मनःपूर्वक स्वागत  केलं. प्रास्ताविकात  लायनक्लबच्या या शिबिर भरवण्या मागील भूमिका स्पष्ट करून विविध विभागात प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.त्यात- कराटे शिकवणारे प्रफुल कावले! स्केटिंग शिकवणारे-राहुल  लोंबार चेस  शिकवणारे- लक्ष्मण पवार! लाठी काठी शिकवणारे- रवींद्र जगदाळे आणि खास बॅडमिंटन शिकवणारे युवराज पारगे यांचा समावेश होता.

यावरील शिक्षकांचे विद्यार्थी राज्य आणि देशपातळीवर- स्पर्धेत यशस्वी ठरलेले चॅम्पियन आहेत! शिबिराचे उद्घघातक- ज्येष्ठ लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्तिमत्व विकासात आपला आहार विहार आणि विचार हा किती महत्त्वाचा आहे हे विविध उदाहरणातून विशद केले! त्यात पालकांचा- शिक्षकांचा आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे! त्याशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही हे अनेक उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिराचं उत्तम आयोजन आणि नियोजन करण्यासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यात- हेल्थ क्लब चेअरमन एडवोकेट लायन मनोहर दाभाडे- लायन मयूर राजगगुरव- लायन राजेंद्र झोरे- लायन प्रकाश पटेल- लायन भरत पोद्दार  लायन सौ अनिता बाळसराफ – शिक्षक राहुल लोंबर आणि बॅडमिंटनपटू चिरंजीव युवराज पारगे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल! माजी लायन अध्यक्ष दीपक बाळसराफ यांनी सर्व शिक्षक- पालक आणि संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानलेत! त्यानंतर लगेचच शिबिरातील प्रशिक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

error: Content is protected !!