तळेगाव दाभाडे:
संदीपान  गायकवाडसामाजिक, सांस्कृतिक, शारिरिक, कला व क्रिडा  कार्यकारी संस्था, मोहोळ सोलापुर,व साप्ताहिक कृष्ण लीला आयोजित  राष्ट्रीय सामाजिक, कला साहित्य
संमेलन मोहोळ जि.सोलापुर  सन २०२३ कौतुक सन्मान सोहळ्यात तळेगाव दाभाडे येथील अनिल वसंतराव वेदपाठक  यांना समाज भूषण  पुरस्कार देवून सन्मानितकरण्यात आले.

स्वातंत्र सेनानी संदीपान दादा गायकवाड सभागृह येथे अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या शुभहस्ते वेदपाठक यांना पुरस्कार देवून सन्मानित केले. संमेलनाचे अध्यक्ष पद राजन पाटील माजी आमदार यांनी भूषविले. यशवंत माने, विधानसभा सदस्य उपस्थित होते.

या पुरस्कार समारंभानंतर मोहोळ येथे पांचाळ  सोनार समाज सेवा संघ सोलापूर व श्री.संत नरहरी बहुउशीय पांचाळ सोनार समाज सेवा संघ मोहोळ यांच्या  वतीने  मोहन वेदपाठक, पदनकुमार दीक्षित, राजेश श्रीहरी दीक्षित यांच्या वतीने वेदपाठक यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!