

कुसवली: आंदर मावळातील निराधार आजी-आजोबांसाठी असलेल्या सहारा वृध्दाश्रमास प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी काल भेट दिली.
मावळातील कुसवली या आदिवासी गावात असलेल्या या वृध्दाश्रमात रस्त्यावर सापडलेल्या व कुटूंबाने सोडून दिलेल्या १४ आजी आजोबांचे वास्तव्य आहे. येथून हाकेच्या अंतरावरच चोप्रा यांचा आलिशान बंगला आहे.दर आठवड्याला ते येथे येतात.आज त्यांनी सहारा वृध्दाश्रमात येऊन येथील आजी आजोबांना मिठाई व फळे आणून सर्वांची आस्थेने विचारपूस केली. प्रत्येकाची कहाणी जाणून घेतल्यानंतर ते भावनाविवश झाले.
आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी त्यांचा या प्रसंगी छोटेखानी सत्कार केला.
- लोहाराचा भाता हलवित रंगले कविसंमेलन: शब्दधन काव्यमंचचा अनोखा उपक्रम
- लक्ष्मीबाई हरिभाऊ दाभाडे पाटील यांचे निधन
- ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल सरपंचपदासाठी २७ला आरक्षण सोडत
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे



