🙏”ज्ञानेशांचा संदेश”💐
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १३ वा” *बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे।* *एक्या केशिराजे सकळ सिद्धी।।*
नाहीतर पुष्कळ लोक बुध्दीवान असतात पण ते आपल्या बुद्धीचा उपयोग केवळ कनक, कांता, कीर्ती आणि सत्ता यांच्या प्राप्तीसाठीच करतात, हे सर्व करणे म्हणजे बुद्धीचा दुरूपयोग करणे होय.
✅ सुख देणाऱ्या पुष्कळ वस्तू असून देखील आपल्या मनाची तळमळ कायम राहते. दृष्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे, ती अशाश्वत असते.
“अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.”
म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृष्य वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. बुद्धीचे खरे वैभव केशिराजाची, भगवंताची कृपा संपादन करण्यात आहे.
भगवंताचा कृपाप्रसाद जोपर्यंत लाभत नाही, त्याचे चरणी मन वेधले गेले नाही, स्थिर झाले नाही, रमले नाही, तोपर्यंत कितीही दैवी शक्ती, यौगिक शक्ती व कुबेराची संपत्ती प्राप्त झाली तरी ती सर्व साधकाला व्यर्थ उपाधीच होय. *ऋद्धि सिद्धी निधी अवघीच उपाधी।* *जव त्या परमानंदी मन नाही।।*
त्यापासून सुख शांती न मिळता त्याची अधोगतीच होण्याची शक्यता आहे.
शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, अत्यंत रम्य असे जे समाधान ते हरिचिंतन करणाऱ्या नामधारकाच्या ठिकाणी रमते. *ज्ञानदेवी रम्य रमले समाधान।* *हरीचे चिंतन सर्वकाळ।।*
समाधान प्राप्त व्हावे यासाठीच सर्वांची धडपड असते. पण अविरत प्रयत्न करून सुद्धां हे समाधान कोणालाच प्राप्त होत नाही.
ज्याप्रमाणे स्वत:ची सावली पकडणाऱ्या मुलाला ती कधीच प्राप्त होत नाही, उलट ती सावली पुढे पुढेच जात राहते, त्याप्रमाणे समाधान प्राप्त करून घेण्याची धडपड जे करतात त्यांच्या हाताला ते कधीच लागत नाही.
✅”समाधान हे मोठे धन आहे”. ज्याच्याजवळ समाधान आहे त्याला आरोग्य, शांती, यश, किर्ती प्राप्त होते. म्हणून एक म्हण आहे, ….
“न मागे त्याची लक्ष्मी होय दासी” समाधानी माणसाला सर्व कांही प्राप्त होते.
नामधारकाला ही धडपड करावी लागत नाही, अखंड नामस्मरणात रंगून गेलेल्या नामधारकाच्या अंत:करणात हे रम्य असे समाधान आपण होऊन वस्तीला येऊन राहते. *सर्वकाळ नामचिंतन मानसी।* *समाधान मनासी समाधी हे।।*
एरव्ही असाध्य असे हे समाधान फक्त नामधारकाच्या अंत:करणात रमते.
म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिव्हाळ्याने उपदेश करतात, *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र (sp)1047*