वडगाव मावळ : कान्हे विविध विकास सोसायटीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भरीव अर्थसहाय्य करेल अशी ग्वाही जिल्हा बॅकचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली.
कान्हे विविध विकास सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या “खरीप भातपिक कजॅ वाटप कार्यक्रमात श्री माऊली दाभाडे हे बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय शिंदे, बंडुभाऊ सातकर दशरथ सातकर एकनाथ येवले विलास जांभुळकर सुदाम आगळमे अशोक सातकर सौ. नंदाताई सातकर संस्थेचे सचिव गणपतराव भानुसघरे बॅंक विकास अधिकारी सुभाष टेमगिरे व सोसायटीचे शेतकरी सभासद उपस्थित होते.
कान्हे विविध विकास सोसायटीमध्ये,कान्हे,साते, जांभुळ ब्राह्मणशाही, महत्वाची या गांवामधील शेतकरी सभासद असुन या सभासदांना भात पिक कजॅ वाटप करण्यात आले.
कान्हे विविध विकास सोसायटीने कान्हे ग्रामपंचायतीकडे प्रशासकीय इमारत बांधकामासाठी जागेची मागणी केली आहे. जागा मिळताच बॅंक बांधकामासाठी लागणारे आवश्यक तेवढे कजॅ उपलब्ध करून देईल असे श्री दाभाडे यांनी यावेळी सांगितले.
संस्थेचे संचालक बंडुभाऊ सातकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सचिव गणपतराव भानुसघरे यांनी आभार मानले.
- टाकवे येथील मित्रांनी १८ वर्षांनी एकत्र येऊन थंडीत वाटले गोरगरिबांना स्वेटर
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा