गडद: वनभोजनाची परंपरा अद्यापही “गडद” गावात जपली जाते.गडद गावातील महादेवा भंडारा पार पडला.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्याती “गडद” गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. डोगर,कडे कपारी.. जंगल यांनी व्यापलेला हा प्रदेश. निसर्गाचा समृद्धपणा गडद गावाला लाभला आहे. गावच्या मागे भलामोठा डोंगर आहे. डोगरपायथ्याला विस्तिरण गर्द अशी आंबेराई आहे या आंबेराई मधिल आम्रवृक्ष शेकडो वर्ष जुने आहेत त्यांची आभाळाशी स्पर्धा चालली आहे असे वाटते इतके ते उंच आहेत.
या आंबेराईला देवराई असे ही म्हणतात मावळ पट्ट्यात अशा देवराई देवाच्या नावाने आवर्जुन जपल्या जातात या आंबेराईत चैत्र महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महादेवाचा भंडारा आयोजीत केला जातो. डोंगरावर असलेली महादेवाची पिंडीला अभिषेक केला जातो. त्याचे दर्शन घेतले जाते… जी काही तरूण मंडळी आहेत ती पुढे दुर्गेशवराचे दर्शन घेण्यासाठी पुढे डोंगरकडा चढून जातात ती वाट खुप अवघड असल्या मुळे ज्याच्या कडे हिम्मत आहे तोच दुर्गेश्वराचे दर्शन घेण्यास जातो…. भंडार्या निमित्त दिवसभर देवराईत भजन/ किर्तन केले जाते सायंकाळी संपुर्ण गावकरी व पै पाहुणे वनभोजन करतात…. या वनभोजनाची मजा काही औरच आहे. रात्र जागवण्यासाठी भारूड किंवा भजन ठेवले जाते.

error: Content is protected !!