दशकपूर्ती सामुदायिक सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध
वडगावमध्ये स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचे आयोजन
वडगाव मावळ :
येथील स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा या दशकपूर्ती सोहळ्यात अतिशय दिमाखदार पद्धतीने ११ जोडपी विवाहबद्ध झाली.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात आयोजित केलेल्या या सोहळ्याचा शुभारंभ श्री पोटोबा महाराजांच्या अभिषेकाने झाला. दुपारी १२ वाजता वधु वरांचा साखरपुडा संपन्न झाला, यावेळी कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा दीपाली गराडे, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी शुभेच्छा दिल्या तर नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वागत केले.

यानंतर वधूवरांचा हळदी समारंभ पार पडला, तसेच दुपारी १ ते ३ यावेळेत वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची व मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा ची व्यवस्था करण्यात आली होती. पंचायत समिती समोरील चौकापासून गणपती मंदिर, मोरया चौक, शिवाजी चौक, चावडी चौक ते विवाहस्थळ या मार्गावर सर्व नवरदेवांची बग्गीमध्ये बसवून प्रभात बँड व वाजंत्री पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तरुणांचा सहभाग व फेटा बांधून सहभागी झालेल्या महिला खास आकर्षण ठरले.

सायंकाळी माजी मंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, जेष्ठ नेते माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, हभप मंगल महाराज जगताप, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, महिलाध्यक्षा पद्मावती ढोरे, पोलीस निरीक्षक विलास भोसले, बाळासाहेब ढोरे, सुभाषराव जाधव, अशोक बाफना आदींच्या उपस्थितीत ११ जोडप्यांच्या शुभविवाह संपन्न झाला. यावेळी आमदार शेळके यांना समाजभूषण तर प्रतिष्ठानचे संचालक अतुल राऊत यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

वधुवरांना प्रतिष्ठान च्या वतीने संसारपयोगी भांडी, संपूर्ण पोशाख, चांदीचे अलंकार, विवाहनोंदणी प्रमाणपत्र तसेच उद्योगपती जयराम वालेचा, व्याख्याते विवेक गुरव, नंदा नारायण ढोरे यांच्या वतीने आकर्षक भेट तर सतीश तुमकर, बाळासाहेब तुमकर यांच्या वतीने मनगटी घड्याळ भेट देण्यात आले. पंढरीनाथ ढोरे यांनी प्रास्ताविक केले, अतुल राऊत, प्रवीण ढोरे व शरद ढोरे यांनी सूत्रसंचालन केले, गणेश विनोदे यांनी आभार मानले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश विनोदे, कार्याध्यक्ष सदाशिव गाडे, कार्यक्रम प्रमुख विवेक गुरव, उपाध्यक्ष शंकर ढोरे, सचिव अक्षय बेल्हेकर, खजिनदार अनिल कोद्रे, महेश तुमकर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अर्जुन ढोरे, राजेंद्र कुडे, अरुण वाघमारे, सुनील शिंदे, काशिनाथ भालेराव, राजेश बाफना, विलास दंडेल, रोहिदास गराडे, सोमनाथ धोंगडे, अविनाश चव्हाण, शरद ढोरे, सुनील दंडेल, राहुल ढोरे, अजय धडवले, मंगेश खैरे, महेश तुमकर, विशाल वहिले, अविनाश कुडे, खंडू काकडे, गणेश पं. ढोरे, अनिकेत भगत, विनायक लवंगारे, संतोष निघोजकर, गणेश झरेकर, बाळासाहेब तुमकर, सतीश गाडे, संजय दंडेल, भाऊसाहेब कराळे,  कमलेश चव्हाण, आकाश म्हाळसकर, दिनेश ढोरे, गणेश अ. ढोरे, सुहास विनोदे, विनोद ढोरे, सचिन काकडे, संभाजी येळवंडे, दर्शन वाळूंज, केदार बवरे, प्रथमेश घाग, सुधीर ढोरे, कार्तिक यादव आदींसह महिला संचालकांनी संयोजन केले.

मंगल महाराज जगतापांनी जपली परंपरा !
सामुदायिक विवाह सोहळ्यास दरवर्षी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासह सहभागी वधूपैकी एका वधूचे कन्यादान म्हणून या उपक्रमास मदत देतात. यावर्षी त्यांनी शुभाशीर्वाद देताना एका वधूचे कन्यादान म्हणून मदत देत परंपरा जपली.

दशकपूर्ती निमित्त रक्तदान शिबिर

दशकपूर्ती सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त येथील श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये प्रतिष्ठान च्या वतीने व गरवारे रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व वऱ्हाडी मंडळी असे ३१ जणांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!