वडगावात सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध
वडगाव मावळ
येथील स्वर्गीय माजी सरपंच पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी घालून दिलेली आदर्श शिकवण आणि वारसा जपत स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान मार्फत आयोजित सामुदायिक विवाह सोहळा-2023 रविवार, 16 एप्रिल रोजी संपन्न झाला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 11 जोडपी विवाहबद्ध झाली.
सर्वसामान्य कुटुंबातील नव वधू-वरांसाठी हा सामुदायिक विवाह सोहळा मोठा आधार बनला आहे. मागील दहा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने यशस्वीरीत्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात आतापर्यंत 150 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यंदा सोहळ्याच्या दशकपूर्ती निमित्त गोर गरीब समाजातील व उच्चशिक्षित कुटुंबातील वधू वरांनी या मध्ये सहभाग नोंदवला.
या विवाह सोहळ्यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके यांना समाजभूषण पुरस्काराने आणि वडगाव मधील सामाजिक कार्यकर्ते अतुल राऊत यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मदन बाफना, माऊली दाभाडे, ह.भ.प. मंगल महाराज जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सोहळा समितीचे या वर्षीचे अध्यक्ष पत्रकार गणेश विनोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे