रमझानच्या उपवासाने संयम आणि त्यागाची शिकवण
:किशोर आवारे
तळेगाव स्टेशन येथील प्रसिद्ध नूर मज्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.रमजानच्या उपवासाने म्हणजे रोजाने मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण मिळते.
झपाट्याने वाढणाऱ्या तळेगाव शहराच्या विकासात मुस्लिम बांधवांनी  हातभार लावावा असे  आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केले आहे.

तळेगाव स्टेशन येथील नुर मज्जीद येथे जनसेवा विकास समितीच्या वतीने रमजानच्या पवित्र दिनानिमित्त इफ्तार भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. नूर मज्जिद चे विश्वस्त जमीर भाई नालबंद, यांनी किशोर आवारे यांचा इफ्तार निमित्ताने सत्कार केला.

रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये, मुस्लिम बांधवानद्वारे रोजाच्या माध्यमातून उपवास केले जातात. रोजा मुस्लिम बांधवांना संयम, त्याग, मनःशांती बहाल करतात त्याद्वारे समाजामध्ये मुस्लिम बांधव आपल्या वर्तणुकीतून एक आदर्श निर्माण करत असतात त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे आवारे यांनी स्पष्ट केले.

नूर मज्जिद चे विश्वस्त माजी नगरसेवक आयुब भाई शिकीलकर, बाबा मुलानी, आमिन खान सर, वासिम शेख,आदींनी इफ्तार चे नियोजन केले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, नगरसेवक सुनील कारंडे , रोहित लांघे, प्रवक्ते मिलिंद अच्युत कार्याध्यक्ष कल्पेश भगत ,अनिल भांगरे ,सुनील पवार , संजय बनसोडे,जलील शेख   उपस्थित होते.

error: Content is protected !!