टाकवे बुद्रुक:
कै. तुकाराम उर्फ बुवा कोद्रे यांच्या दशविधी क्रिया निमित्ताने टाकवे बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.
   
कै. तुकाराम कोद्रे भाजपचे जेष्ठ नेते निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या दशविधी कार्यक्रमानिमित्त त्यांचे बंधू उद्योजक पप्पू कोद्रे व कै. बुवा कोद्रे यांच्या मित्रपरिवारच्या वतीने व लाईफव्हिजन मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  त्यांच्या राहत्या घरी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले .

या  शिबिरामध्ये एकूण ७७ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.या तपासणी मध्ये ०७  मोतीबिंदू पेशंट सापडले. मोतीबिंदू ऑपरेशन मोफत होणार आहे. शिबिरामध्ये डोळ्यांची घ्यावयाची काळजी व त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

error: Content is protected !!