टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यातील भोयरे ग्रामपंचायतीची कर वसुली सन२०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये १०० करण्यात आली. कर वसूल करत असताना ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक ,ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत यांनी कर संकलन करण्यावरती भर दिला .
ग्रामस्थांनीही आपली जबाबदारी ओळखून कर वेळेत भरल्यामुळे ग्रामपंचायत ही १०० टक्के कर वसुली करणारी मावळ तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली.कर वसुली करता ग्रामस्थांचे सहकार्य खूप महत्त्वाचे असते आणि ग्रामस्थांनी जर कर वेळेत भरला तरच ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची विकास कामे असतील काही मूलभूत सेवा सुविधा पुरवायच्या असतील तर ग्रामपंचायत ही कामे १०० टक्के करू शकते .
तसेच ग्रामपंचायत ने ५% अपंग कल्याण निधी व १०% महिला बालकल्याण १५ % अनुसूचित जाती जमाती खर्चही १०० % केलेला आहे.सलग चौथ्या वर्षी १००% कर वसुली करणारी मावळ तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली.
या आर्थिक वर्षात कर मागणी रक्कम रुपये ५,७३,११२ हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे .
सरपंच वर्षा अमोल भोईरकर म्हणाल्या,’ वर्षाच्या सुरुवातीला कर भरण्याबाबत मासिक सभेत चर्चा झाली. त्याचे नियोजन केले .करभरा व दाखले उतारे घेऊन जा अशी ग्रामस्थांना विनंती ही केली ग्रामपंचायतीला सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या मात्र ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून कर भरला .
काही सभासद पुणे मुंबईला राहत असल्याने त्यांनी ऑनलाईन करायचे पैसे भरले त्यामुळे ग्रामपंचायत १०० % कर वसुली करता आली कर वसुलीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर खुरसूले , शंकर भोईरकर ,गजानन भोईरकर यांची मदत झाली .
पंचायत समिती गटविकास अधिकारी सुधीर भागवत, विस्ताराधिकारी बाळासाहेब वायकर ,सहाय्य गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती ग्रामसेविका प्रमिला मारुती सुळके यांनी दिली.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस