टाकवे बुद्रुक:
येथील कै. तुकाराम (बुवाभाऊ) दशरथ  कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त लाईफ व्हिजन मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतिबिंदु शस्त्रक्रिया आयोजित केली आहे.

गुरुवार १३/०४/२०२३ रोजी राहत्या घरी,टाकवे बु।। ता. मावळ, जि. पुणे येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. बुवा कोद्रे आंदर मावळातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. ग्रामीण पक्ष संघटना वाढीसाठी केलेले काम वाखण्या सारखे होते.

कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष संघटना वाढीसाठी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या भावना भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. तर माझा जीवाभावाचा सहकारी गमावल्याचे दु:ख माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केले.

कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त देखील सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला आहे.

error: Content is protected !!