पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
पुणे:
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशन विजय तेंडुलकर नाट्यगृह ,पुणे येथे संपन्न झाले. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार होते.त्याप्रमाणे शासकीय कार्यक्रम देखील प्रसिद्ध करण्यात आला होता.

परंतु मुंबईमध्ये काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्याने  अजित पवार यांनी दुपारी दीड वाजता पुण्यातील आजचे व उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे प्रयाण केले. याबद्दल दादांचे प्रतिनिधी म्हणून अधिवेशनास उपस्थित झालेले पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

अधिवेशनात मांडलेल्या सर्व मागण्या व ठराव आदरणीय दादांपर्यंत पोहचविण्याचे काम मी करतो अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आबा बागुल उपस्थित होते. भविष्यामध्ये शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षकांसह रस्त्यावर उतरू असे आश्वासन त्यांनी दिले.

        त्रैवार्षिक अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे,बदलीचा सहावा टप्पा रद्द करणे, दुर्गम भागातील शिक्षकांना त्यांच्या सोयीच्या तालुक्यात बदली देऊन दुर्गम भागातील रिक्त जागा भरती प्रक्रियेने भरणे, महानगर पालिकेतील प्राथमिक शिक्षकांना कॅशलेस मेडिकल सुविधा लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील पदे भरावीत, शाळेची नियमित वेळ साडेदहा ते पाच करावी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचा दैनंदिन अध्यापनातील हस्तक्षेप बंद करावा यासह शिक्षक हिताचे विविध ठराव संमत करण्यात आले. या सर्व ठरावांची लेखी बुकलेट तयार करून येत्या आठवडाभरात आदरणीय दादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
       
    मे महिन्यात राबविण्यात येणाऱ्या निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्याध्यक्ष  केशवराव जाधव यांनी केली.
   
      त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेले  दत्तात्रय वारे , अंकुश माने  यांचा शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सभागृहातील उपस्थित सर्व गुरुजनांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरामध्ये दोघांच्या कार्याप्रती मानवंदना दिली.
     
    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते, कार्यक्रमाचे अध्यक्ष  माधवराव पाटील (आप्पा) यांनी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ २०२३ ते २०२६ कार्यकारणी घोषित केली.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारणी
नेते
महादेव गायकवाड (बारामती)
अध्यक्ष नारायण कांबळे (मावळ),सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड (बारामती) ,कार्याध्यक्षअजय जाधव (पुरंदर),कोषाध्यक्ष विलास थोरात (हवेली) ,संपर्कप्रमुख
अंकुश साबळे (जुन्नर),प्रसिद्धी प्रमुख अनिल मिटे (इंदापूर),उपाध्यक्ष  शिवाजी लडकत (बारामती), रमेश सावळे
(जुन्नर)
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी
नेते रोहिणी तावरे  (बारामती)
अध्यक्ष शोभा वहिले (मावळ) सरचिटणीस  सरला दिवटे
(जुन्नर)
पुणे महानगरपालिका कार्यकारणी*
नेते- श्री नितीन राजगुरू
अध्यक्ष- श्री बाळकृष्ण चोरमले यांची निवड करण्यात आली.

यावेळी  लायक पटेल सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, लोमेश वऱ्हाडे कार्याध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, संभाजी बापट कोषाध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,बाळासाहेब काळे  सल्लागार,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ स्मिता सोहनी राज्याध्यक्ष महिला आघाडी, सिद्धेश्वर पुस्तके
कोषाध्यक्ष,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ,तुकाराम कदम सल्लागार,  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ  विजय बहाकर सल्लागार,  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्यासह  सर्व राज्यसंघ पदाधिकारी,सर्व जिल्हा अध्यक्ष व सन्माननीय पदाधिकारी,सर्व तालुका अध्यक्ष व सन्माननीय पदाधिकारी,पुणे जिल्हा व पुणे शहर सर्व संघप्रेमी शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!