विस्तार अधिकारी पदी श्रीरंग चिमटे यांची नियुक्ती
वडगाव मावळ:
पुणे जिल्हा परिषदेच्या पदोन्नती जाहीर करण्यात आल्या असून मावळ तालुक्यातील जेष्ठ शिक्षक श्रीरंग श्रीपती चिमटे यांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
त्यांच्या कडे खेड तालुक्यातील चाकण या बीटाची जबाबदारी देण्यात आली आहे. चिमटे गुरूजी यांनी अडतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत मावळ तालुक्यातील विविध भागात ज्ञानदानाचे काम केले. सेवाकाळात त्यांनी मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघ कोषाध्यक्ष व मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहिले.
चिमटे हे ग्रेड मुख्याध्यापक संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष व खडकाळे शाळेचे मुख्याध्यापक व खडकाळे केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.भविष्यात विद्यार्थी हितासाठी विविध उपक्रम राबवून शिक्षण विभाग अधिक गतिमान करणार असल्याचा विश्वास चिमटे यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता चिमटे त्यांच्या पत्नी आहेत. त्यांनीही अंगणवाडी सेविका म्हणून काम केले आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस