🙏”ज्ञानेशांचा संदेश”🌷घ
(प्रथम आवृत्ती १९६१)
“सार्थ हरिपाठ”
अभंग २ रा
ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात, —
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ।
भरला घनदाट हरि दिसे।।
आता भगवद्’गीतेमध्ये काय सांगितलंय ?
”ईश्वरः सर्वभूतानां हृदेशेऽर्जुन तिष्ठति।”
भगवद्’गीतेमध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे की “ईश्वर सर्व भूतमात्रांमध्ये आहे”, वास्तविक, पाच हजार वर्षापूर्वी हा असा अलौकिक सिद्धांत मांडला गेला म्हणजे आपला हा भारत देश किंवा हिंदुस्तान देश किती प्रगत (advanced) होता, किती पुढारलेला होता ह्याची आपल्याला कल्पना येईल.
“ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ। भरला “घनदाट” हरि दिसे।” म्हणजे ….
”घनदाट” असं म्हटलेलं आहे. म्हणजे भूतमात्रामध्ये घनदाट हरी भरलेला आहे, हे सांगितलेलं आहे. म्हणून …
आपल्या धर्मामध्ये हा एक फार मोठा सिद्धांत जो सांगितलेला आहे, त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. *"ईश्वर सर्व भूतमात्रामध्ये आहे''*
हा अलौकिक सिद्धांत आहे. हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय की ह्याकडे मला तुमचं सर्वांचं लक्ष वेधायचंय. हा सिद्धांत अलौकिक आहे. पण ह्या अलौकिक सिद्धांताकडे आपलं सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. कारण हा सिद्धांत लोकांना समजत नाही. आज हा सिध्दांत मोठ्यांच्या, छोट्यांच्या, पंडितांच्या वगैरे लक्षातच येत नाही. ह्या सिद्धांतामध्ये “वर्म काय, मर्म काय, रहस्य काय” हे लक्षात येत नाही. कारण ईश्वर, म्हटल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ज्या कल्पना येतात त्या चुकीच्या आहेत.
हरिपाठामध्ये म्हटलंय, —
सर्वांघटी राम देहादेही एक।
सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी।
सगळ्या देहांना “घट” म्हटलंय त्या सगळ्या “घटांमध्ये” राम आहे, असं म्हटलेलं आहे. हा ईश्वर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर “चैतन्यशक्ती”!
हरिपाठाच्या …. अखंड नामस्मरणाच्या प्रभावाने,
ज्ञानेश्वर महाराज सांगतात, …
माझ्या चित्ताचे चैतन्य झाले, दृष्टी हरिरूप झाली व सर्वत्र हरीच घनदाट भरलेला आहे असे प्रत्यक्ष दिसू लागले आणि हा भूलोक मला साक्षात वैकुंठच झाला.
चित्त चैतन्यी पडता मिठी।
दिसे हरिरूप अवधी सृष्टि।
असा स्वानुभव ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे तुकाराम महाराजही सांगतात. अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने नामधारकाच्या “आंत आणि बाहेर’’ संपूर्ण पालट होतो. *गातो एका ध्यातो एका।* *अंतर्बाह्य पहातो एका।।*
अशी त्याची स्थिती होते.
ज्या नामाने ही स्थिती प्राप्त होते ते नाम सर्वांनी आत्मसात करावे.
म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात, ..
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1022*
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे