टाकवे बुद्रुक:
बिबट्याच्या दहशतीने आंदर मावळातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.
मागील दोन वर्षापासून आंदर मावळातील खांडी,कुसूर,डाहूली,बेंदेवाडी,लालवाडी,सोपावस्ती,चिरेखान,लोहटवाडीत बिबट्या आढळून येत आहे.बिबट्याच्या दहशतीने नागरिक रात्री अपरात्री घराबाहेर फिरकत नाही.
अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहेच.
बक-या ,कुत्रे खाणे ही बाब बिबट्या साठी नवी नाही. मंगळवारी ता.२८ ला दुपारी एकच्या सुमारास कुसुर येथील काळूराम बाबू विरणक यांच्या दोन बक-यांचा बिबट्याने फडशा पाडला.
विरणक आपल्या मालकीच्या जागे बक-या चारत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला व काळू विरणक यांच्या दोन बकऱ्या जागीच ठार केल्या. विरणक यांचे नुकसान झाले.या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी विरणक यांनी केली.
शासकीय सोपस्कार पार पाडीत प्रशासन सबंधित शेळी पालक शेतक-याला मदत करीन,परंतू बिबट्याच्या दहशतीने घाबरलेल्या जनतेला कसा विश्वास देणार हा प्रश्न आहे.एरव्ही रानावनात आढणारा बिबट्या आता शेट शेळया मेंढ्या वर हल्ला करू लागल्याने भीतीचे सावट वाढले आहे.
दरम्यान,खांडी जवळच्या १८ नंबर परिसरात दोन बिबट्याचे बछडे आढळून आले असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे