मावळ तालुका तायक्वोंदो असोसिएशनचे रौप्य महोत्सवी वर्ष कै. दत्तात्रय गवळी यांच्या नावाने स्मृतीचिन्ह लोणावळा :
मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनला 2023 या साली 25 वर्ष (रौप्य महोत्सवी वर्ष) पूर्ण झाली आहे. अनेक खडतर मार्गातून प्रवास करत या संस्थेने रोपट्याचे रूपांतर वृक्षात केले आहे. ते केवळ संस्थापकीय कार्याध्यक्ष कै. दत्तात्रय कों. गवळी व संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे यांच्या प्रचंड मेहनतीने आजचा सुदीन आला.
तसेच त्यांच्याबरोबर असणारे सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. आज या संस्थेतून 1700 विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहे व शिकत आहे. संस्थेच्या मावळात व लोणावळ्यात विविध ठिकाणी शाखा आहेत व तायक्वोंदोचे क्लासेस घेतले जातात.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा भांगरवाडी, लोणावळा. येथे रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. दत्तात्रय कों. गवळी यांच्या नावाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
तसेच वर्ष भरात ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य, कास्यपदक मिळवलेल्या खेळाडूंचाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहेत. कार्यक्रमात प्रथम कै. दत्तात्रय कों. गवळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत पुष्पे वाहण्यात आली. तदनंतर दीप प्रज्वलन सुरेखा जाधव (माजी नगराध्यक्षा लोणावळा) , श्रीधर पुजारी (माजी उपनगराध्यक्ष लोणावळा) , निखिल कविश्वर (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) ,संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश दत्तात्रय गवळी, संस्थापक अध्यक्ष मास्टर विक्रम बोभाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस हर्षल होगले, सदस्य जाकीर खलीफा (संचालक मुस्लिम को.ऑप. बॅक लि. पुणे ) उपस्थित होते. निखिल कविश्वर यांनी संस्थेबद्दल माहिती व विविध अनुभव सांगितले. सुरेखा जाधव यांनी कै. दत्तूभाऊ व विक्रम बोभाटे यांनी कशाप्रकारे संस्था उभारणीसाठी खडतर प्रवास केला हे सांगितले.
श्रीधर पुजारी यांनी संस्थेबद्दल अनुभव व्यतीत करीत येणाऱ्या अडचणी सोडवण्याबद्दल तप्तर आहे असे सांगितले. नारायण पाळेकर (माजी उपनगराध्यक्ष लोणावळा), दिलीप लोंढे ( माजी नगरसेवक लोणावळा) यांनीही आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर यांच्यासह सुधीर शिर्के (माजी उपनगराध्यक्ष),जितूभाई कल्याणजी (मा सभापती) , रवी पोटफोडे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा) ,यशवंत पायगुडे (मा. सभापती),मारुती साठे (संस्थापक चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लोणावळा) ,दत्तात्रय येवले (मा. नगरसेवक),विनोद भोगले (अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, लोणावळा) ,सनी पाळेकर (मा. अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस) ,योगेश पैलकर ( मानवाधिकार लोणावळा शहराध्यक्ष ) ,रवी बोईने (उद्योजक) ,मनोज द. गवळी (उद्योजक) , सूर्यकांत औरंगे ( संचालक श्रीराम नागरी सह. पत. मर्या. लोणावळा.) ,प्रशांत गवळी ( संचालक श्रीराम नागरी सह. पत. मर्या. लोणावळा.) ,श्रावणी कामत (अध्यक्षा पुणे जिल्हा पत्रकार) संजय चव्हाण (पत्रकार) तसेच सरचिटणीस हर्षल होगले, सदस्य अमोल गायकवाड, पार्थ गवळी, संस्कृती गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर खरीफा (संचालक मुस्लिम को. ऑप. बँक पुणे) आभार जितेंद्र कल्याणजी यांनी मानले. कार्यक्रमा अंतर्गत खेळाडूंचे विविध गुणदर्शनाचा लाभ मान्यवर, विद्यार्थी व पालकांनी घेतला. अनेक प्रेक्षकांनी हजेरी लावली.