मुंबई:
डबेवाला पुतळा परिसराचे सुशोभिकरण करा अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.अध्यक्ष तळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही मागणी केली.
तळेकर म्हणाले,” मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले आहे. बहुतेक ठिकाणी फुटपाथ नविन केली जाते आहे. बहुतांश चौकांचे नुतनिकरण केले जाते आहे. विद्युत खांबांना लईडी लाईट बसवल्या जात आहेत. भिंती रंगवल्या जात आहेत. या मुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडत आहे. हा बदल निश्चित स्वागतार्य आहे.
मुंबई महानगर पालिका नुतनीकरणा अंतर्गत डबेवाला कामगाराचा पुतळा ज्या दक्षिण मुंबई मधिल हाजीअल्ली चौकात आहे हा चौक परिसर ही सुशोभित करण्यात यावा अशी मागणी “ मुंबई डबेवाला असोशिएशन “ पालिका प्रशासनाकडे करत आहे.
या हाजीअल्ली चौकात “डबेवाला कामगार” याचा भव्य पुतळा आहे. दक्षिण मुंबई मधिल बाकीचे पुतळे पाहीले तर ते ठरावीक चौथर्याच्या उंचीवर आहेत त्या मुळे ते शोभिवंत व आकर्षक दिसतात व लांबून पाहीले तरी लोकांच्या दृष्टीस ते पडतात पण डबेवाला कामगार याचा पुतळा थेट जमिनीवर लावण्यात आला आहे. त्या मुळे तो पुतळा जवळ गेल्या शिवाय दिसत नाही.
महानगर पालिका प्रशासना कडे आम्ही मागणी करत आहेत की सदर पुतळ्याला ठराविक उंचीचा चौथरा बांधा व त्या चौथर्यावर हा पुतळा ठेवा.. कि जेणे करून तो बहुतांश लोकांच्या दृष्टीस पडू शकेल. तसेच पुतळा परिसराचे नव्याने नुतनिकरण करण्यात यावे रात्रीच्या वेळेत या पुतळ्यावर अंधार असतो शक्य झाले तर या पुतळ्यावर रात्रीच्या वेळी ऐखाद्या प्रकाश झोतांची व्यवस्था केली पाहीजे की जेणे करून तो पुतळा रात्री ही लोक व्यवस्थित पाहू शकतील.
“डबेवाला कामगार” यांचा पुतळा दक्षिण मुंबई मधिल हाजीअल्ली सारख्या वि.आय.पी. चौकात बसवला आहे याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. तात्कालिन मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांचे शुभहस्ते त्याचे अनावरण करण्यात आले होते. मुंबई महानगर पालिकेने हा श्रमसंस्कृतीचा केलेला सन्मान आहे असे आम्ही मानत.
त्या बद्दल मुंबई महानगर पालिकेचे आम्ही आभार मानतो. आणी मुंबई महानगर पालिका आयुक्त व प्रशासनाकडे मागणी करतो की “ डबेवाला कामगार” पुतळा हा चौथर्यावर बसवावा, तेथे विद्युत झोताची सोय करावी, पुतळ् परिसराचे नुतनी करण करण्यात यावे कि जेणे करून हा परिसर शोभिवंत व आकर्षक दिसून येईल.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम