तळेगाव दाभाडे:
समाजातील प्रत्येकाने स्री जन्माचे मनापासून स्वागत केले तरच समाजात स्री पुरूष समानता येईल, असा विश्वास डाँ. लता पुणे यांनी येथे केला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डाँक्टर पुणे या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रेश्मा फडतरे,या होत्या तर यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे होते.
यावेळी बोलताना डाँक्टर पुणे म्हणाल्या की निसर्गाचा समतोल राखत प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे तर पत्रकार सौ.फडतरे म्हणाल्या की महिलानीच महिलाचा आदर,सन्मान करायला हवा. तर महिलांवर होत असलेल्या अन्याय विरुद्ध आवाज उठविण्यासाठी महिलांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
महिलामध्ये स्वच्छतेचा उपजत गुण असुन त्यांनी समाजाच्या जडणघडण साठी सक्रिय सहभाग घ्यायला हवा असे मुख्याधिकारी सरनाईक म्हणाले.
यावेळी नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पथनाट्य सादर केलेल्या तेजस्विनी बचत गटातील महिलांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय स्वच्छ वाडॅ स्वच्छ मार्केट स्वच्छ ऑफीस स्वच्छ हाॅस्पिटल स्वच्छ हाॅटेल आदीचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या कायॅक्रमाचे सुत्रसंचालन महिला बचत विभागाच्या. सुवर्णा काळे व विभा वाणी यांनी केले होते .यावेळी नगरपरिषदेमध्ये काम करत असलेल्या सर्व महिला कमॅचारी अधिकारी उपस्थित होते.