सोमाटणे:  आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या   उपसरपंचपदी महेंद्र भोईर यांची बिनविरोध निवड झाली .ठरविलेला कालावधी पूर्ण झाल्याने मावळत्या उपसरपंच सोनल जगदाळे यांनी आपल्या राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नंदा भालेसेन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.                                                                 उपसरपंच पदासाठी भोईर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच नंदा भालेसेन यांनी जाहीर केली.
ग्रामविकास अधिकारी पूनम जमदाडे  यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.यावेळी माजी उपसरपंच योगेश भोईर ,ग्रामपंचायत सदस्य पप्पू चांदेकर ,मंगेश येवले सदस्या मंदा घोटकुले ,चैत्राली पशाले ,शैला भोईर यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!