लोणावळा:भारत सरकारच्या आयुष मंत्रालय “योग प्रमाणी करण मंडळाच्या (Yoga Cerification Board) “योग तज्ञ” पदी कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालय “योग प्रमाणी करण मंडळाच्या “योग तज्ञ” पदी कैवल्यधाम योग संस्थेचे सुबोध तिवारी यांची नियुक्ती

जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांची तीन वर्षाकरिता किंवा जोपर्यंत YCB एक स्वायत्त संस्था कार्यकारी होत नाही तो पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.

तिवारी हे कैवल्यधाम संस्थेत गेली एकोणतीस वर्षे कार्यरत आहेत. परमपूज्य स्वामी कुवलयानंद यांनी १९२३ साली कैवल्यधाम संस्थेची स्थापना केली.

संस्थेची वाटचाल शंभर वर्षाकडे यशस्वीरीत्या विकासकामां‌द्वारे पुढे नेण्यासाठी तिवारी यांचे मोलाचे योगदान आहे. संस्थेच्या शताब्दी वर्षात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योगविषयक कार्यक्रम राबविले गेले आहेत.

यापुढेही विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी कार्यक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संस्थेच्या शताब्दी वर्षात भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती सन्मानीय रामनाथ कोविन्द, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल रमेस बैस, बिहार स्कूल ऑफ योगा चे स्वामी निरंजनानंद सरस्वती, भारताचे नौदलप्रमुख, एडमिरल राधाकृष्णन हरि कुमार, मावळ तालुक्याचे खासदार श्रीरंग बारणे अशा अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या योगविषयक कार्यक्रम आणि उपक्रमांसाठी भेटी दिल्या आहेत.

error: Content is protected !!