वडगाव मावळ:फ्रेन्ड्स ग्रुपचे दोन ट्रेकर सभासद सुरेश चाळू पाटील आणि .सोमनाथ गुरूअण्णा मेलशेट्टी हे  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावर करण्याचे फ्रेन्ड्स ग्रुपने केला.
फ्रेन्ड्स ग्रुप शिक्षक मित्रपरिवार सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो. रक्तदान शिबीर, गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम , पूरग्रस्तांना मदत , वाड्या वस्त्यांवरील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणास हातभार लावणे इत्यादी अनेक उपक्रम फ्रेन्ड्स ग्रुप गेल्या पंधरा वर्षापासून राबवत आहे.
  सहदेव डोंबे, महादेव भालशंकर, अशोक कराड,संदीप कांबळे, योगेश ठोसर,संजय ठाकर, बजरंग सूर्यवंशी, हरिश्चंद्र शिवदे आदी सभासद उपस्थित होते.या सगळ्या मंडळीची सफर त्यांच्या तोंडून ऐकूयात.खंडोबाच्या माळावर गाड्या पार्क करून किल्ल्यावर चढाईला सुरुवात केली. जंगल भागातून रूळलेल्या वाटेने भरभर चढाई करून  सर्वजण बालेकिल्ल्याच्या दिशेने सरसावले. बालेकिल्ल्याची चढाई बऱ्यापैकी कठीण आहे. सराव असल्याने सर्वजण भरभर चढाई करून बालेकिल्ल्यावर पोहोचले.
स्वराज्याची पहिली राजधानी राजगड याच मंतरलेल्या आणि पावन भूमित आमच्या दोन मावळ्यांचा सेवापूर्ती समारंभ घ्यायचा होता.  श्री सुरेश चाळू पाटील हे जि. प. प्राथ. शाळा गोळेवाडी (मंगरूळ), ता. मावळ, जि. पुणे येथे व श्री सोमनाथ गुरूअण्णा मेलशेट्टी हे जि. प. प्राथ. शाळा वेळू, ता. भोर, जि. पुणे येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. दोघांनी आपल्या शिक्षकी पेशात अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम अविरत पणे 36 वर्षे सेवा केली आहे.
   सुरेश पाटील सर याचे मानपत्र वाचन श्री. महादेव भालशंकर सर यांनी तर श्री सोमनाथ मेलशेट्टी सर यांचे मानपत्र वाचन श्री. संजय ठाकर सर यांनी केले.सत्कारमूर्तींना पूर्ण पोशाख, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. सत्कारानंतर दोघांनीही आपल्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या अनेक कटु-गोड अठवणी सर्वांसोबत शेअर केल्या. या पवित्र ठिकाणी आमच्या सेवापूर्तीनिमित्त आपण फ्रेन्ड्स ग्रुपच्या माध्यमातून जो अनोखा कार्यक्रम घेतला त्याबद्दल दोघांनीही धन्यवाद व्यक्त केले. एक हृद्य व अविस्मरणीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला.

error: Content is protected !!