
पिंपरी : सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका या संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त संत तुकारामनगर, पिंपरी येथे अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, प्रशासकीय अधिकारी हर्षद कावरे, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून अभ्यास करून प्रशासकीय सेवेत लँड सर्वेअर म्हणून निवडले गेलेले हर्षद कावरे यांनी, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ समाजसुधारक नव्हते; तर त्यांनी आर्थिक विषमतेवरही भाष्य केले. आर्थिक समानता हीच खऱ्या सामाजिक बदलाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांचे मत होते!’ असे विचार मांडले. नंदू कदम यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर दलित, मागास, शोषित व पीडित वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना प्रवाहात सामावून घेण्यासाठी संघर्ष केला. आजच्या काळातही त्यांचे विचार मोलाचे ठरतात!’ असे मत व्यक्त केले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालयाच्या लिपिक माधुरी नेरकर यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. महेंद्र बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रदीप बोरसे यांनी आभार मानले.
- वडगावमध्ये रविवारी सामुदायिक विवाह सोहळास्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान चे आयोजन
- मिळालेल्या मताधिक्याच्या इतकी एक लाख दहा हजार झाडे लावणार – आमदार शेळके
- प्रगतीशील शेतकरी चिंधू वाळुंज यांचे निधन
- सार्थक वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेला अद्ययावत इन्टरॲक्टीव्ह विज्ञान प्रयोगशाळा
- जीवनगाथा बहिणाबाईंची’ : १९ एप्रिलला बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावरील नि:शुल्क रंगमंचीय आविष्कार

