
कामशेत : सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला वाडीवले येथील वीटभट्टी कामगारांच्या लहान मुलांना खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप व शाळेला बोर्ड, सतरंजी साहित्य देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
वीठभट्टीवरील कामगारांच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आले तेसच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून वीट भट्टी वरील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.या आगळा वेगळा उपक्रमचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार डाकवे,चेतन वाघमारे तर कार्यक्रमाचे आभार रुपाली कटके यांनी मानले या वेळी सह्यादी विद्यार्थी अकादमीचे सहदेव केदारी,तेजस वाघवले, सचिन शेडगे, अनिश शर्मा, अंकुश काटकर, सचिन गायकवाड,किशोर वाघमारे,निकिलेश दौडें,प्रसन्न पार्टे, अमोल तिकोने, लक्ष्मण शेलार,बाळासाहेब जमादार,वैभव हजारे आदी जण उपस्थित होते.
- रमेश जांभुळकर यांचे निधन
- सोहम् ग्रंथालयाच्या वतीने महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
- मैं ना भूलूंगा…’ मैफलीद्वारे स्वर्गीय मनोजकुमार यांना सांगीतिक श्रद्धांजली
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा संपन्न
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

