
वडगाव मावळ:मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील सर्व छोट्या मोठ्या सोसायटींना आणि अनेक बैठी घरांना टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यांच्या मोरया प्रतिष्ठानचे येत्या दोन महिन्यांतील सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून ह्या १ एप्रिल पासून वडगाव शहरातील सर्व छोट्या मोठ्या सोसायटींना टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
वडगाव शहरातील अनेक सोसायटी धारकांना आणि ज्या बैठी घरांना नगरपंचायत माध्यमातून कमी दाबाने पाणीपुरवठा होतो अशा सर्वांसाठीही मोरया प्रतिष्ठानच्या वतीने टँकर मोफत पाणी पुरवठा सुरू देखील केला आहे.शहरातील जवळपास 85 टक्के विकासकामे पूर्ण झाल्याने नागरिकांचा दिवसेंदिवस वडगाव मध्ये स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. यंदाचा उन्हाळा अतिशय तीव्र असून दरवर्षीच साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यातील पाणीटंचाईमुळे अनेक भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
या चैत्र वैशाखात ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवानिमित्त वडगाव शहराची यात्रा असते. यावेळी सर्वांकडेच पाहुणेमंडळी नातेवाईक यांची खूप मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई भासू नये म्हणून आणि प्रत्येक नागरिकाच्या उन्हाच्या झळा कमी व्हाव्यात म्हणून आम्हाला जसं शक्य होईल तसं.. सामाजिक बांधिलकी जपून आपण प्रत्येक समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने उन्हाळा संपेपर्यंत आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मा नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आणि अबोलीताई ढोरे यांच्या स्वखर्चातून टँकरने संपूर्ण वडगाव शहरात मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील 40 कोटींची फिल्टर पाणी योजना मंजूर झाली आहे. येत्या मे किंवा जून महिन्यात सदरील कामाचा भूमिपूजन शुभारंभ देखील आमदार शेळके यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरीही पुढील वर्षीचा उन्हाळा सर्वांचांच छान जाण्यासाठी व वडगाव टँकर मुक्त करण्यासाठी आणि जनतेच्या पाणी प्रश्नावर निकाली तोडगा काढण्यासाठी 40 कोटींची पाणी योजना तत्काळ सुरू करण्याकरिता आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण लवकरच सर्वजण मिळून एकत्रितपणे जनतेच्या पाणी प्रश्नावर भव्य जनमेळाव्याचे आयोजन करणार आहोत.
तोपर्यंत यावर्षीच्या उन्हाळ्यात ज्यांना कोणाला पाणीपुरवठा कमी होत आहे त्यांनी आमच्या मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयातील या 9822838823 क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अबोली ढोरे यांनी केले आहे.
- सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
- अंकुश येवले वाघजाई माता बोडशीळ आदर्श शिक्षक ग्रामगौरव पुरस्काराने सन्मानित
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या पवनमावळ अध्यक्षपदी कांचन भालेराव यांची निवड
- ‘ ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा…’ उसाच्या रसासवे रंगले कविसंमेलन
- कर्तृत्वाने मोठे होऊन चांगले वागा: देशमुख महाराज

