
वडगाव: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज वडगाव मावळ येथील इ. सातवी मध्ये शिकणाऱ्या स्नेहा सोनवणे यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 25000 रुपये स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.
गुरुशाला व व्होडाफोन Idea foundation आयोजीत online assessment मध्ये संपूर्ण भारतातून इ. 6वी ते 12वी पर्यंतच्या 3 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार होती. उपशिक्षिका निता शेटे यांनी विद्यालयातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांचे online Registration करून घेतले.
त्यापैकी सुमारे 700 विद्यार्थ्यांनी ही Online परीक्षा दिली. मुलांचे Id व परीक्षेचे स्वरूप आणि online submission याविषयी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेचा निकाल 13 मार्च रोजी जाहीर झाला त्यामध्ये स्नेहा सोनवणे ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली . त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके, पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड, स्थानिक सल्लागार स्कूल कमिटी सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक समिती सदस्य सर्व शिक्षक वृंद व पालक यांचेकडून तिचे व मार्गदर्शक शिक्षिका निता शेटे यांचे अभिनंदन करण्यात आले.
- सुरेल गीतांनी छेडली श्रोत्यांच्या हृदयाची तार
- जुन्या पिढीतील पै. आनंदा भोते यांचे निधन
- ताजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेश्मा गायकवाड
- स्नेहा सोनवणे हिचे यश
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एनएमएमएस परीक्षेचा धडाकेबाज निकाल

