
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शाहुराज शंकर साबळे यांना डॉक्टरेट पदवी प्रधान
तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयाचे प्राध्यापक शाहूराज साबळे यांना भाभा इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (भाभा युनिव्हर्सिटी भोपाळ) इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषया मध्ये नुकतीच डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली.
प्राध्यापक शाहुराज साबळे यांनी पीएचडी साठी अँड इंटिग्रेशन ऑफ कन्वर्टर विथ ए आय कंट्रोल टेक्निक फोर मिनिमायझिंग टॉऱक रिपिलअँन्ड परफॉर्मन्स ॲनालिसिस ऑफ ब्रशलेस डीसी मोटर ड्राईव्ह या विषयावर रिसर्च गाईड डॉ. अशोक कुमार झ्याला यांच्या मार्गदर्शनाखाली भाभा इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट भोपाळ येथे संशोधन केले.
संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे ,उपाध्यक्ष गणेश खांडगे ,सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकी कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई सीईओ डॉ .रामचंद्र जहागीरदार प्रा. डॉ. एस.एन.सपली यांनी डॉ. शाहूराज साबळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात आर्टिफिशल इंटेलिजंट या विषयांमध्ये नवनवीन संशोधन करून त्यांचा उपयोग महाविद्यालय तसेच समाजासाठी करण्याचा मानस डॉ.साबळे यांनी व्यक्त केला.
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एनएमएमएस परीक्षेचा धडाकेबाज निकाल
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शाहुराज साबळे यांना डॉक्टरेट
- कामशेत येथे महिला कार्यगौरव सोहळा संपन्न
- रमजान ईद निमित्त इंदोरीत खजूर वाटप : प्रशांत भागवत युवा मंचाचा उपक्रम
- संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा – आमदार सुनील शेळके

