इंदोरी : प्रशांतदादा भागवत युवा मंचच्या वतीने रमजान ईद निमित्त परिसरातील मुस्लिम बांधवाना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देऊन त्यांना खजुराचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, पोलीस निरीक्षक रणजित जाधव, पोलीस निरीक्षक प्रशांत रेळेकर, हमीद भाई मुलाणी, दाऊदभाई तांबोळी, सलीम मुलाणी, रमजान तांबोळी, रियाज तांबोळी, रशीद मुलाणी, आयुब मुलाणी, सलमान इनामदार, जाफरभाई मुलाणी, इनुस इनामदार, रियाज इनामदार, उपस्थित होते. खजूर आणि गुलाब पुष्प देऊन भाईचारा  व सलोख्याच्या शुभेच्छा दिल्या.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत  म्हणाले, ” रमजान ईद निमित्त सर्वाना शुभेच्छा. पवित्र रमजानच्या आनंदात सहभागी होता आले. याचा आनंद आहे. पवित्र कुराणातील शिकवण आपणांस प्रेरक व मार्गदर्शक ठरेल.

error: Content is protected !!