वडगाव मावळ:

मोरया प्रतिष्ठानचे संस्थापक वडगाव नगरीचे मा नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही वडगाव शहरात उत्सव संस्कृतीचा मराठी अस्मितेचा याद्वारे भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून गुढीपाडवा शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

या शोभायात्रेमध्ये मराठी संस्कृतीचे वैभव, परंपरांचा अभिमान आणि एकात्मतेचे प्रतीक यांचे भव्य दर्शन सर्वांना अनुभवायला मिळाले. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळ, संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन रथ, संत परंपरा या चित्ररथांसह लेझीम पथक, आदिवासी कला पथक, मंगळागौर, रांगोळी पायघड्या, लाठीकाठी मर्दानी खेळ, आगीचे प्रात्यक्षिके, वारकरी पथक – दिंडी परंपरा, तसेच पारंपरिक लोककला संच वासुदेव, पोतराज, वाघ्या मुरुळी, नगारा, नंदी बैल ) इत्यादी मराठमोळ्या परंपरेचा समावेश होता.

सनई-चौघड्यांच्या मंगल नादात, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले लहानथोर सहभागी झाले होते. हलगीच्या ठेक्यांवर नाचणारे आदिवासी कला पथकाचे सादरीकरण तर डोळ्यांना आणि मनाला तृप्त करणारे होते. बैलगाडीवर गुढी उभारून विविध लोककलांचे सादरीकरण आणि शिवरायांच्या गजरांनी संपूर्ण वातावरण भारावले होते. महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरांचा हा सोहळा पाहून मन भरून आलं. संस्कृतीची ही समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास मावळचे आमदार सुनिल शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे, मा ता काँग्रेस मा अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मुक्ताई चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर, जेष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, रा. काँ. वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, पोटोबा देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, तज्ञ संचालक सुभाष जाधव, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, उपनगराध्यक्ष पुनम जाधव, रा काॅं कातवी अध्यक्षा सुवर्णा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सतिश ढोरे, अर्जुन ढोरे, चंदुकाका ढोरे, मा नगरसेवक राहुल ढोरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुल वायकर, पुनम जाधव, माया चव्हाण, नगरसेवक राजेंद्र कुडे, सचिन कडू, बजरंग ढोरे, नितीन चव्हाण, मंगेश खैरे, मयूर गुरव, अतिष ढोरे, वैभव पिंपळे आदींसह वडगाव ग्रामस्थ, जैन विहार ग्रुपचे सर्व सदस्य आणि मोरया प्रतिष्ठानचे सभासद महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका व हितचिंतक क्रियाशील कार्यकर्ते तसेच शहरातील जेष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील अनेक नागरिक, लहान मुले, महिला भगिनी मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते.

मिरवणूकीदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे व आनंदाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या शोभायात्रेत वडगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याबद्दल मा नगराध्यक्ष मयूर ढोरे अबोली ढोरे आणि अबोली ढोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!