पिंपरी : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे औचित्य साधून रावेत येथे  भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे, मोरेश्वर भोंडवे, जयश्री भोंडवे, संगीता भोंडवे, नीलेश तरस, राजेंद्र तरस आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

सामुदायिक आरती आणि आणि रामरक्षेने शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. पारंपरिक वेषभूषा परिधान केलेल्या लहान मुलांनी ‘विठ्ठल – रखुमाई’ असा जयघोष केल्याने रावेतमध्ये अलंकापुरी अवतरल्याचा आभास निर्माण झाला होता. याचबरोबर पाणी बचतीचा प्रभावी संदेश शोभायात्रेतून देण्यात आला; तर लाठी, भाला, दांडपट्टा या मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, शिवस्तुती, शिवराज्याभिषेक या कार्यक्रमांच्या माध्यमातून जाज्वल्य इतिहासाचे नागरिकांना स्मरण करून देण्यात आले. लेगसि एक्झोटिका सोसायटीचे ढोलताशा पथक, सेलेस्टील सिटी सांस्कृतिक मंडळ, सिल्वर ग्रासिया सांस्कृतिक मंडळ, सद्गुरू चौक मित्रमंडळ, चंद्रभागा कॉर्नर मित्रपरिवार, परिसरातील विविध सहकारी गृहसंकुल, ज्येष्ठ नागरिक संघ आणि बहुसंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

अमोल कालेकर, चैतन्य देशपांडे, यतीन पतकी, तुषार निकम, वीरेंद्र सोनवणे, सोमनाथ गुरव, अनंत जोशी, राहुल चौधरी, महेश कुलकर्णी, प्रवीण किंबहुने, अनुया चव्हाण यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

error: Content is protected !!