नवलाखउंब्रे: येथील सुधा आणि बुधानदीच्या संगमावरील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवाचा सोहळा सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रम होत असून राम विजय ग्रंथाचे पारायण केले जात आहे. सोमवार ता. ३१पासून हा सोहळा सुरू आहे. सायंकाळी ७ ते ९ यावेळेत अनुक्रमे ह.भ.प. आसाराम महाराज बढे (आळंदी),ह.भ.प. सचिन महाराज पवार (आळंदी,पुणे),ह.भ.प. पांडुरंग महाराज शितोळे (बीड),ह.भ.प..माऊली महाराज जळकेकर (जळके, जळगाव),ह.भ.प. राम महाराज शाखी (वेदांतचार्य),ह.भ.प.डॉ. शंकर महाराज शेवाले (लांडेवाडी, आंबेगाव)यांची किर्तने आहे. ह.भ.प. तुषार महाराज दळवी (माजे, मावळ) यांचे काल्याचे किर्तन होईल. येथील साक्षात्काराची आख्यायिका सर्वश्रुत आहे. बाराही महिने वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात. नित्यनेमाने पुजा आणि महाआरती होते.

error: Content is protected !!