
वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा,महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचा व श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.
मंगळवार दि. १ एप्रिल ला सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह, वडगाव ता. मावळ येथे हा मेळावा होणार आहे.मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिलाध्यक्ष दिपाली गराडे, युवक अध्यक्ष किशोर सातकर यांनी केले आहे.
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचा एनएमएमएस परीक्षेचा धडाकेबाज निकाल
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शाहुराज साबळे यांना डॉक्टरेट
- कामशेत येथे महिला कार्यगौरव सोहळा संपन्न
- रमजान ईद निमित्त इंदोरीत खजूर वाटप : प्रशांत भागवत युवा मंचाचा उपक्रम
- संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा – आमदार सुनील शेळके

