पुणे: खुनाच्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे .एका आरोपीने सीआरपीसी कलम ४३९ अंतर्गत नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता,तो न्यायालयाने मंजूर केला.
या खटल्यात आरोपीतर्फे  ॲड. ऋषिकेश  शर्मा यांनी युक्तिवाद करीत हा निकाल मिळवून दिला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश सालिंगीकर आणि  ॲडसतीश गोडेर यांनी केले, तसेच ॲड. खेताराम सोलंकी, ॲड. सोहम यादव,ॲड . संकेत राव आणि ॲड.सागर राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
आरोपीचे वकील ॲड. ऋषिकेश शर्मा यांनी न्यायालयासमोर ठोस युक्तिवाद करताना काही मुद्दे मांडले:आरोपीवर फक्त संशयाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ठोस पुरावे नाहीत.साक्षीदारांचे जबाब परस्परविरोधी आहेत, त्यामुळे आरोपीविरुद्धच्या आरोपांमध्ये तफावत आहे.चौकशी पूर्ण झाली असून, दोषारोपपत्र (Charge-sheet) दाखल झाले आहे, त्यामुळे आरोपीला कोठडीत ठेवण्याचे कारण नाही.
आरोपी ११ महिन्यांपासून तुरुंगात आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाने “Bail is a rule, jail is an exception” हा सिद्धांत दिलेला आहे.तसेच ॲड.शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या निकालांचा आधार घेतला• Allarakha Habib Memon v. State of Gujarat (2024) 8 SCR 34 Gulbar Hussain v. State of Assam (Criminal Appeal No. 181/2013)

error: Content is protected !!