तळेगाव दाभाडे :नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठअंतर्गत पहिल्या सत्रामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये एसजीपीए १० पैकी १० आणि विषयांत १०० पैकी १०० गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, डॉ. शेखर रहाणे, प्रबंधक विजय शिर्के, इनक्यूबेशन सेंटरचे सीईओ मुजाईद शेख, डॉ. अश्विनी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रथम वर्ष संगणक विभागातील विद्यार्थिनी  स्नेहाली सावंत १० पैकी १० ग्रेड पॉईंट मिळवून विद्यापीठामध्ये प्रथम आली. तसेच ओम ढमाले, करुणा इप्पाली, साक्षी वाबळे, प्रणाली भेगडे, मजुषा शेट्टी, वेदिका पडवळ, आयुष निर्मल, वरद सोनावणे, प्रतीक मंजुनाथ, कीर्ती तांबे, ज्योती लुगडं, विधी मिश्रा, सार्थक तरळेकर, अदिती तरटे, शुभम गायकवाड हे विद्यार्थी विविध विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून विद्यापीठामध्ये अव्वल ठरले आहेत .
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. शेखर रहाणे यांनी केले प्रा. प्रतीक्षा तनपुरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आनंद दौलताबाद यांनी आभार व्यक्त केले तर विभागप्रमुख प्रा. प्रेमकुमार कोल्ले व डॉ.दिग्विजय पाटील कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!