
वडगाव मावळ: वणवे जनजागृती व वन्यप्राण्यांबद्दल माहिती वनपरिक्षेत्र – शिरोता अंतर्गत येणाऱ्या वनअधिकाऱ्यांकडून नाणे, नाणोली व साई गावामधील जिल्हा परिषद शाळांमध्ये वन व वणवे जनजागृती तसेच वाण्याप्रण्यांसंदर्भात व्हिडिओ क्लिप दाखवून माहिती देण्यात आली.
मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रविण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे अध्यक्ष अनिल अंद्रे यांच्या नेतृत्वाखाली या जनजागृतीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना वन, वणवे, वन्यप्राण्यांचे पर्यावरणातील महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जंगलातील अन्नसाखळीचे महत्व, वणव्यांमुळे अन्नसाखळीवर होणारे दुष्परिणाम, वणवे लागण्याची कारणे, वणवे लागल्यावर उपाययोजना? याबद्दल वनपरिक्षेत्र शिरोता येथील वनपरिमंडळ अधिकारी एम बी घुगे, डी डी उबाळे, एस बी साबळे तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली.
- मावळ तालुक्याच्या विकास कामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांची पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

