
वडगाव मावळ : शिवजयंती महोत्सवानिमित्त वडगाव मावळ येथे शुक्रवार, दि. १४ ते सोमवार, १७मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर व उत्सव समितीचे अध्यक्ष अतिश ढोरे यांनी दिली.
म्हाळस्कर व ढोरे म्हणाले “, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमात दि. १४ रोजी सकाळी शिवप्रतिमेचे अनावरण वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, पोलिस निरीक्षक कुमार कदम, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे यांच्या हस्ते होईल. सकाळी ९ ते ११ महाराष्ट्राच्या मातीतील मानाची दगडी गोटी उचलणे हा शिवकालीन मर्दानी खेळ होईल.
शनिवार, दि. १५ रोजी महिलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम ‘या गं सयांनो: खेळ खेळू या पैठणीचा’ होणार असून, महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. दि. १६ रोजी विविध वयोगटातील मुला-मुलींसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सायंकाळी सात वाजता शाहीर देवानंद माळी (सांगली) यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह सिनेअभिनेते रमेश परदेशी व श्रीकांत यादव उपस्थित राहणार आहेत.शाहीर देवानंद माळी (सांगली) यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम, तसेत पुरस्कार वितरण होणार आहे.दि. १७ रोजी वीस फुटी शिवमूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री नऊ वाजता ‘छावा’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
कार्याध्यक्ष प्रशांत भिलारे, कार्यक्रम प्रमुख संतोष चव्हाण, उपाध्यक्ष रोहित गिरमे, दर्शन वाहिले, गणेश भिलारे, युवराज म्हाळसकर, सचिव अतुल म्हाळसाकर, सहसचिव प्रज्योत म्हाळसकर, खजिनदार दीपक कुडे, कुलदीप ढोरे, प्रसिद्धीप्रमुख विकी म्हाळसकर, संतोष भालेराव हे संयोजन करीत आहेत.
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा

