तळेगाव दाभाडे :  येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये “आंतरराष्ट्रीय महिला दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मायमर मेडिकल कॉलेज च्या असिस्टंट मेडिकल सुप्रिडंट डॉ. स्वाती मगरे, डॉ. अर्चना राजे,  ऍड. माधुरी फुगे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तद्प्रसंगी एनएमआईटीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार,  एनएमआयईटी चे प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, डॉ. अश्विनी शिंदे,  महिला सबलीकरण समितीच्याप्रमुख डॉ. रोहिणी हंचाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आजची स्त्री ही कार्यक्षम आहे मग ती नोकरी करणारी असो किंवा गृहिणी असो प्रत्येक स्त्रीने विविध स्तरांवर स्वतःला सिद्ध केले आहे. प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे परंतु या सर्व प्रवासात तिचे आरोग्य हे निरोगी आणि तणावमुक्त असलेच पाहिजे.’ असे मत डॉ. स्वाती मगरे यांनी  बोलताना व्यक्त केले. डॉ. अर्चना राजे यांनी तणावमुक्त राहण्यासाठी अतिशय सोप्या शब्दात कानमंत्र सांगितले.
‘ स्त्रियांच्या वाट्याला कायम अनेक संघर्ष आलेला आहे. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो. परंतु न डगमगता स्त्रियांनी आपला प्रवास चालू ठेवलाय. स्त्री काल पण श्रेष्ठ होती आणि आज ही आहे. पूर्वी स्त्रियांचे अस्तित्व हे चुल आणि मूल या पुरतेच मर्यादित होते. परंतु आताच्या काळात स्त्रीने आपले वर्चस्व विविध स्तरांवर दाखवून दिले आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना स्त्रीने कणखर असले पाहिजे,’ असे मत ऍड. माधुरी फुगे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी महिला सुरक्षितता बाबत च्या कायद्यांची माहिती सांगितली.
   याप्रसंगी अनेक विविधगुणदर्शन आणि  सांस्कृतिक कार्यक्रमांचे डॉ. हर्षा सरोदे यांच्या नियोजनाच्या माध्यमातून आयोजन कारणात करण्यात आले. प्राध्यापिका  महिलांनी काव्यवाचन, चारोळ्या , कविता सादरीकरण केले.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सारिका पाटील यांनी केले.  प्रा. सीमा महाळुंगकर यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ.रोहिणी हंचाटे यांनी आभारप्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन महिला सबलीकरण समितीच्या सदस्य प्रा. आरती बिंदू, प्रा. धनश्री कुलकर्णी, प्रा.भारती धोटे, प्रा हर्षला रितापुरे  यांनी केले

error: Content is protected !!