
वडगाव मावळ: बजरंग दल मावळ आयोजित “रक्तदान महायज्ञ” शिबिरात ५० विर बजरंगिनी रक्तदान केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानमास निमित्त आयोजित “रक्तदान महायज्ञ” शिबिरात ५० विर बजरंगीनी रक्तदान करून आहुती दिली.
धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या ( तारीख : २८ फेब्रुवारी २०२५ ते २९ मार्च २०२५) या काळात संपूर्ण देशात पाळला जातो. बजरंग दल मावळ यांच्या वतीने यावर्षी बलिदानमास निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,
दररोज सायंकाळी ७ वाजता गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहमधे सामूहिक श्लोक व प्रार्थना आयोजित केली जाते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना धर्मवीर बलिदानमास चे महत्व पटवून देण्यात येत आहे. या काळात शेकडो विद्यार्थ्यांनी चहा, कॉफी, नॉनव्हेज, चप्पलचा त्याग केला तर काहींनी टक्कल करून बलिदानमास पाळले आहे. याच निमित्ताने वडगाव शहरात रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतमाता, शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले याप्रसंगी पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, संतोष म्हाळस्कर, आकाश वारुळे, नवनाथ भोसले, पवन दंडेल, जय आंबेकर, मच्छिंद्र गाडे, योगेश शेटे, आदित्य जाधव, प्रनाल निंबाळकर, स्वप्नील भालेकर, आदित्य अर्णाळे, राहुल पठारे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व आभार अमोल ठोंबरे यांनी मानले.
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम
- रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , खेळ पैठणी कार्यक्रमांमध्ये शेकडोच्या संख्येने सहभाग

