
तळेगाव दाभाडे: पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. मावळ तालुक्याचे जेष्ठ नेते, श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक/ सहकारभूषण बबनराव भेगडे यांच्या प्रयत्नाने निवड बिनविरोध झाली.
पुणे जिल्हा साखर संकुल येथे हीनिवडणूक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रदिप कंद, जिल्हा सहकारी फेडरेशन सचिव शहाजी रानवडे, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, सुभाष जाधव,संतोष मुऱ्हे,सचिन भेगडे,विजय शेंडे यावेळी उपस्थित होते.
संतोष भेगडे यांचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व सहकार , कला -क्रीडा अशा विविध क्षेत्रात मोठा वावर आहे. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पटसनसंस्थेचे अध्यक्ष म्हणून १० वर्षे काम केले, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक, पुणे महानगर नियोजन समिती (PMRDA ) सदस्य, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सदस्य असून या पदांना त्यांनी न्याय दिला आहे. त्यांनी राजकीय व सहकार क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. संतोष भेगडे फाउंडेशनच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
नवनिर्वाचित संचालक संतोष भेगडे म्हणाले,”निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले व या पदावर काम करताना मी पतसंस्था यांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करील. पतसंस्थांची वसुली १०० % झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. फेडरेशन च्या माध्यमातून पतसंस्थाच्या थकीत कर्ज वसुली करिता कलम 101 व 156 चे कामे प्रभावि पणाने व लवकरात लवकर मार्गी लावण्या करिता प्रयत्नशील राह.या डिजिटल स्पर्धेच्या युगात पतसंस्थांनी आपली कार्य व नवीन सेवा ग्राहकांना देण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून वेळोवेळी कर्मचारी व पतसंस्था संचालक यांना प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध राहू .


- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे
- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत ‘ पवना विद्या मंदीर प्रथम
- येळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मणिषा ठाकर बिनविरोध
- जांभूळच्या ग्रामविकास अधिकारी कल्याणी लोखंडेंना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार

