पवनानगर : येळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मनीषा ठाकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या सरपंच बायडाबाई कालेकर यांनी पदाचा  राजीनामा दिला होता.
त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी मनिषा ठाकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा सहाय्यक निवडणूक अधिकारी मारुती चोरमले यांनी केली. ग्रामसेवक मनोहर चांदगुडे, महसूल सेवक रामदास कदम यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच सीमा ठाकर, उपसरपंच नीलेश ठाकर, अक्षय कालेकर, सचिन सुतार हे सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्ष विठ्ठल ठाकर, मल्हारी घोडके, ज्ञानेश्वर ठाकर, मुकुंद ठाकर, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश ठाकर, दत्तोबा महाराज ठाकर, गणपत ठाकर, अमित कालेकर, महादू दळवी, आबु ठाकर यांच्या सह ग्रामस्थांनी भंडारागुलालाची उधळण करून आनंद साजरा केला.
मणिषा ठाकर म्हणाल्या, “सरपंच पदी निवडून दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. विकास कामांसाठी पाठपुरावा करणार आहे.

error: Content is protected !!