वडगाव मावळ: जांभूळच्या  ग्रामविकास अधिकारी कल्याणी लोखंडेंना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गोवा येथे नववे जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन, गोवा राष्ट्रीय प्रमुख सरपंच संघटना ,नवी दिल्ली, बाबू जगजीवन राम कला,संस्कृती आणि साहित्य  अकादमी ,दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कला आणि साहित्य विभाग, संस्कृती भवन पाटो पणजी (गोवा) येथे पार पडला.
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील जांभूळ गावचे ग्रामपंचायत अधिकारी कल्याणी ज्ञानेश्वर लोखंडे यांना प्रा. डाॅ. सुनिल गायकवाड  माजी खासदार (लातूर) यांच्या शुभ हस्ते आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्या करीता चंद्रकांत कवळेकर,गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री ,डाॅ.संदिप खोचक, डाॅ. बी एन. खरात, डाॅ.प्रा.गोरख ससाठेबाजी खासदार प्रा.सुनिल गायकवाड ,डाॅ.झाकीर खान डाॅ.प्रथमेश आबनावे  ,राहूल उके, यांच्या प्रमुख देवानंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.

error: Content is protected !!