तळेगाव दाभाडे:मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती  उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी इ . ६ वी ते ९ वी चे विद्यार्थी ,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
इ. ३ री ची विद्यार्थिनी प्रियल भोसले व इ . ५ वी च्या सई भेगडे  हिने शिवाजी महाराजांविषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच इ.३ री च्या स्वरांजली ननावरे ह्या विद्यार्थिनीने  शिवमहती  सांगणारा  पोवाडा सादर केला. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना शिवनेरी,प्रतापगड,पन्हाळा,सिंहगड,रायगड  या महत्वपूर्ण किल्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.                                                          
विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मॉसाहेब,बाजीप्रभू,मावळे यांच्या पारंपरिक वेशभूषा धारण केल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी शिंदे यांनी केले. शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी करायची असेल तर महाराजांचे विचार आपल्या अंगी बाणविणे व येणाऱ्या पिढीला महाराजांचा अमूल्य वारसा दाखवायचा असेल तर त्यांच्या गड-किल्यांचे संवर्धन करणे हि आपली नैतिक जबाबदारी आहे असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

काव्या कदम ह्या इ . ३ री च्या विद्यार्थिनीने शिवगर्जना सादर करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ,शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!